कोल्हापूर : जिल्ह्यतल्या राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथली सतरा वर्षीय कॉलेज यवतीचा वाढदिवसादिनी एका मंदिरातील घंटेला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरासह जिह्यात । एकच खळबळ उडाली होती. वाढदिवसा दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने ही आत्महत्या की घातपात अशा चर्चेने परिसर ढवळून निघाला होता. परंतु हा घातपात नसून आत्महत्या असल्याच शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट झालं आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिल आहे. कौसर नासिर नायकवडी या तरुणीने ओढणीने मंदिरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. पोलीस तपासात आठ मित्र-मैत्रिणी यांची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणात सध्या संशयित म्हणून आठ जण ताब्यात आहेत असेदेखील पोलीस अधीक्षक अभिनव देशमख यांनी सांगितले
कोल्हापूर मधील ती घटना घातपात नाही तर ती आत्महत्याच