हैदराबाद : तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. एकीकडे देशभरात या घटनेवरुन संताप व्यक्त होत असताना तेलंगणचे गृहमंत्री मोहम्मद मेहमूद अली यांनी पीडित तरुणीवच खापर फोडलं असून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. तरुणी इतकी सुशिक्षित होती तर मग पोलिसांना फोन करण्याऐवजी बहिणीला कशाला केला? अशी विचारणा त्यांनी केली आहे. जर बहिणीला फोन करण्याऐवजी तिने पोलिसांना फोन केला असता तर कदाचित वाचवता आलं असता असा दावाही त्यांनी केला आहे. ___मोहम्मद मेहमूद अली यांनी म्हटलं आहे की, पीडित तरुणी डॉक्टर असून सुशिक्षित होती. पोलिसांना फोन करण्याऐवजी तिने कुटुंबाला फोन करणं दुर्दैवी आहे. १०० नंबरवर फोन करण्याऐवजी तिने आपल्या बहिणीला फोन तिने केला. या घटनेचं आम्हाला दुखः आहे. पोलीस अलर्ट असून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवत आहेत. पीडित तरुणाने १०० नंबरवर फोन न करता बहिणीला फोन करणं दुर्दैवी आहे. १०० नंबरवर फोन केला असता तर कदाचित तिला वाचवता आलं असतं, असं वक्तव्य मोहम्मद मेहमूद अली यांनी केलं आहे. तरुणीने आपल्या बहिणीला फोन करुन आपण घाबरलो असल्याचं सांगितलं होतं. मी घाबरले आहे. ते सगळे (अनोळखी लोक) बाहेर माझी वाट पाहत आहेत. तू माझ्याशी बोलत राहा, मी घाबरले आहे, असं पीडित तरुणीने फोनवर आपल्या बहिणीला सांगितलं होतं. चार आरोपींना अटक तेलंगण पोलिसांना याप्रकरणी चार आरोपींना अटक
बहिणीऐवजी पोलिसांना फोन केला असता तर वाचली असती? गृहमंत्र्यांनी पीडित तरुणीवरच फोडलं खापर