धाव पाव रे गुरुदत्ता,तुझ्या चरणी टेकतो माथा अवघ्या जगाचा कृपाळू,तूच अनाथांचा नाथा अवघ्या विश्वाचा भार, दत्तात्रया तूच सांभाळीशी कृपाळू दत्ता,चुकले भक्तांचे काही पोटाशी धरिशी......१ | जगतगुरु दाता तुच, विश्वाचा करुणाधन तू गुरुदत्ता शांती समाधान देई, हृदयात कायम भक्तांच्या चित्ता | त्रिगुणात्मक दत्त जाणा, मनी बसे भक्तांत मूर्ती तुमची दत्तराया पूजा करिता,परमानंदाने डोलते काया भक्तांची.....२ अपेक्षांचे ओझे मोह,संसाराच्या गाड्यांनी आम्ही बिटलो चंचल या मायावी नगरीत,मायेच्या पसार्याचा फसलो | दत्त नाम विसरून स्वस्वार्थातच गुंतलो भलेबुरे न कळले | संकटे येताच तुम्हांला, कधी नव्हे ते दत्तनाम स्मरले......३ | भक्तांबर कृपा करी गुरुराया पदी पडतो आम्ही पाया | जीवनी नित्य ते घडावे,तुझी सतत राहो भक्तांबर छाया पामर जगताचा कष्टप्रद मी,भक्ती करे तुझ्यावर दत्तात्रया | आशीर्वाद भक्तांबर,भक्ती वाहतो तब चरणी मी कृपाराया.....प्रेमाला,द्वेषाला,घेतले झेलून,भोग चाले माझ्या प्राक्तनाने | तुझ्या कृपेची कानावर,येई भक्तांची भावपुर्ण नित्य भजने | कुणी दुखावले,कुणी सुखावले,जे घडे ते माझ्या कर्मानी | उमटली उर्मी अन प्रेम,डोळे भरतात माझे नित्य आसवांनी......| अंतरी दाटते भावनेचे बादळ,कृपेने तुझ्याअंगी बळ संचारले | जीवानास आधार तुझा श्रीदत्ता,मनी भक्तीचे पूर वाहिले | मी तुझाच दूत हक्काने, कायम भक्ती करी दत्तात्रयाची | माझ्यावरी ऋण तुझे,आतुरतेने वाट पाही मी दत्तजयंतीची.......
दत्तजयंती